...म्हणून झाडावर केले स्वतःला क्वारंटाईन!

वृत्तसंस्था
Wednesday, 6 May 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले होते. सरकारने परवानगी दिल्यानंतर अनेकजण घरी परतू लागले आहेत.

जयपूर (राजस्थान): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले होते. सरकारने परवानगी दिल्यानंतर अनेकजण घरी परतू लागले आहेत. पण, गाव त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. यामुळे एकाने चक्क शेतामधील झाडावर राहण्याचे ठरवले.

कैद्याने पाहिले स्वप्न अन् केले नको ते कृत्य...

कमलेश मीणा हा युवक किशनगढवरून 160 किमी अंतर पायी चालत भीलवाडा येथील शेरपुरा या आपल्या गावी पोहचला. मात्र कमलेशला गावात येण्यास मनाई करण्यात आली. त्याला प्रथम कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी त्याचे सॅंपल घेतले आणि अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्यास सांगितले. गावकरी आणि आरोग्य विभागाच्या वादामध्ये न पडता त्याने शेतात राहण्याचा निर्णय घेतला. गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या शेतातील झाडावर स्वतःला क्वारंटाईन करण्याची ईच्छा व्यक्त केली. गावकऱ्यांनी परवानगी दिली. यानंतर कमलेशन झाडावरच काही लाकडे आणि प्लास्टिक शीटद्वारे घर बनवले. तेथे तो तब्बल 14 दिवसांपासून राहिला. दरम्यानच्या काळात कमलेशच्या वडिलांनी सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत त्याला जेवण दिले. त्याला अहवाल हाती आल्यानंतर त्याला कुटुंबियांसोबत राहण्यास सांगण्यात आले.

दारूड्याने सापाला धमकावले अन् तोडले लचके...

दरम्यान, कमलेश झाडावर राहात असल्याची माहिती परिसरात रंगली होती. त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus migrant labourer completes quarantine on a tree at rajasthan