पाकिस्तानात बस अपघातात 30 ठार 50 जखमी

वृत्तसंस्था
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

लाहोर- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आज (सोमवार) दोन बसची समोरासमोर धडक होऊन सुमारे झालेल्या अपघातात तीस प्रवासी ठार, तर 50 जण जखमी झाले. हा अपघात लाहोरपासून 600 किलोमीटर अंतरावर रहीम यार खानच्या खानपूर भागात झाला.

एक बस फैसलाबादहून बहावलपूरकडे जात होती, तर दुसरी बस कराचीहून रहीम यार खानकडे येत होती. दोन्ही बसमध्ये समोरासमोर झालेल्या अपगातात तीस ठार तर 50हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना बाहेर काढण्यासाठी कटरचा वापर करावा लागला. जखमींना उपचारासाठी खानपूर आणि रहीम यार खानच्या रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना जखमींना चांगले उपचार देण्याची व्यवस्था करावी, असेही निर्देश दिले आहेत.

Web Title: 30 killed, 50 injured in bus accident in Pakistan