
एका २० वर्षीय पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. विशेष म्हणजे हृदयविकाराचा झटका येण्याआधी छातीत दुखायला लागलं होतं. सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास त्रास व्हायला लागल्यावर इतक्या सकाळी कुणाला बोलवायचं म्हणून एकटाच दुचाकीवरून दवाखान्यात गेले. पण रुग्णालयात पोहोचताच त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि मृत्यू झाला. दीपक कुमार असं पोलिसाचं नाव असून ते लखनऊत माल रहीमाबाद ठाण्यात तैनात होते.