तस्करी करण्यात येणारे 3 कोटी 10 लाखाचं सोनं जप्त; DRI कडून कारवाई

या कारवाईमध्ये जवळपास 5.8 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे.
Smuggling
SmugglingSakal

मुंबई : महसुल गुप्तचर संचालनालयाने (DRI) हवाई मार्गाने सोन्याची तस्करी करणाऱ्या तस्करांना अटक केली असून त्यांच्याकडून तस्करी करण्यात येत असलेले सोने जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मागच्या आठवड्यात करण्यात आली आहे असं DRI च्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

मागच्या आठवड्यात हवाई मार्गाने या सोन्याची तस्करी केली करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर DRI ने छापा टाकत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई मागच्या आठवड्यात करण्यात आली होती.

लखनऊ आणि मुंबई अशा दोन ठिकाणी कारवाई करण्यात आल्याचं DRI च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या कारवाईमध्ये जवळपास 5.8 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. साधारण 3.10 कोटी रुपये या सोन्याची किंमत असल्याचं अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

Smuggling
मनसे नेते पोलिस आयुक्तांच्या भेटीला; वसंत मोरेंचं 'एकला चलो रे'

2 मोटर रोटरमधून हे सोनं वाहून नेण्यात येत होतं. सोनं लपवण्यासाठी मोटर रोटरचा वापर त्यांनी केला होता. मोटर रोटर तोडून सोनं काढण्यात आलं होतं आणि तस्करी करणाऱ्याला तात्काळ अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेले आरोपी हे दक्षिण मुंबईतील होते. अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे असं अर्थमंत्रालयाने सांगितलं.

दरम्यान मागच्या आठवड्यात पाकिस्तानातून येणाऱ्या तस्करी मालावर सीमा सुरक्षा दलाने पंजाबमध्ये कारवाई केली होती. तसेच चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान पाकिस्तानातून अंमली पदार्थ आणि शस्त्रे पाठवण्यात येतात आणि भारताती ल विविध भागात पोहोचवले जातात असं त्यांनी सांगितलं होतं. त्याच प्रकारची कारवाई DRIने केली असून ३.१ कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com