मोदींचा बंपर धमाका; 33 वस्तू होणार स्वस्त! 

वृत्तसंस्था
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली 31 व्या जीएसटी परिषद आज (शनिवार) नवी दिल्ली येथे पार पडली. सध्या दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंवर 28 टक्के जीएसटी आहे. त्यामुळे अनेक वस्तू महागल्या आहेत. परिणामी आजच्या बैठकीमध्ये 33 वस्तूंवरील जीएसटीचा दर कमी करण्यात आला आहे. ज्या वस्तूवर पूर्वी 18 टक्के जीएसटी आकाराला जात होता. तो आता कमी करून त्या वस्तू आता 12 टक्के जीएसटीच्या श्रेणीमध्ये  आणण्यात आल्या आहेत. तर ज्या वस्तूंवर 12 टक्के जीएसटी आकाराला जात होता अशा काही वस्तूंचा 5 टक्के जीएसटीच्या श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

काँग्रेसने लग्झरी वस्तूंच्या गटात मोडणाऱ्या वस्तू वगळता इतर सर्व वस्तूंचा समावेश 18 टक्के जीएसटी श्रेणीमध्ये समावेश करावा अशी मागणी केली होती, अशी माहिती व्ही नारायणसामी यांनी दिली. 

Web Title: 33 Items Moved From 18 pct GST Slab To 12pct, 5pct