esakal | कर्नाटक : नर्सिंग कॉलेजच्या 34 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; कोलार जिल्ह्यातही उद्रेक
sakal

बोलून बातमी शोधा

Christian College of Nursing

सध्या राज्यात लसीकरणावर अधिक भर दिला असून कोरोना कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

कर्नाटक : नर्सिंग कॉलेजच्या 34 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

बंगळूरु (कर्नाटक) : होरामावू येथील ख्रिश्चन कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये (Christian College of Nursing) अवघ्या 5 दिवसांत कोरोना (Coronavirus) रुग्णांची 34 प्रकरणं समोर आली आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री के. सुधाकर (K Sudhakar) यांनी आज (शुक्रवारी) ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं, की यातील काही रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. सध्या राज्यात लसीकरणावर अधिक भर दिला असून कोरोना कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. एका आठवड्यातच राज्यात कोरोनाचा दोनदा स्फोट झाला असून कोलार जिल्ह्यातील नर्सिंग कॉलेजमध्ये मंगळवारी 65 नवीन रुग्ण आढळलेत.

'एएनआय'च्या वृत्तानुसार, नर्सिंगमधील संक्रमित विद्यार्थी केरळ (Kerala) आणि पश्चिम बंगालचे (West Bengal) आहेत. 28 ऑगस्टपासून होरामावूच्या ख्रिश्चन कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये 34 विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह आढळले, यापैकी बहुतेक लक्षणे नसलेले आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्राथमिक आणि माध्यमिक संपर्कांचीही चौकशी केली जात आहे. बहुतांश विद्यार्थी केरळचे, तर काही विद्यार्थी पश्चिम बंगालचे आहेत, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.

हेही वाचा: जगापुढे कोरोनापेक्षा मोठे संकट कर्करोगाचे

ख्रिश्चन कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये कोरोना स्फोटाचं प्रकरण 28 ऑगस्ट रोजी उघडकीस आलं. त्या वेळी संक्रमित झालेल्यांपैकी 32 जणांतील 2 कर्मचारी होते आणि उर्वरित विद्यार्थी होते. मीडिया रिपोर्टनुसार, या सर्वांनी अलीकडच्या काळात प्रवासही केला होता. केरळमधून 20 विद्यार्थी परत आले होते, त्याचवेळी 10 विद्यार्थी पश्चिम बंगालमधून परतले होते. कॉलेज प्रशासनाने बंगळूरू महानगरपालिकेला (Bangalore Municipal Corporation) याबाबत माहिती दिली होती आणि 28 ऑगस्ट रोजी सुमारे 100 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यात 10 विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यांना येथील शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) दाखल करण्यात आले. तर, दुसऱ्या दिवशी आणखी 70 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी 6 पॉझिटिव्ह आढळले. जेव्हा तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली, तेव्हा 30 ऑगस्ट रोजी आणखी पाच विद्यार्थ्यांना संसर्ग झाला होता, तर मंगळवारी सापडलेल्या रुग्णांची संख्या 11 होती.

loading image
go to top