मोदींच्या सभेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या बस अपघातात 35 विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात कांग्रा जिल्ह्यात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'जन आधार रॅली'ला जाताना या बसला अपघात झाला. ही बस एका खासगी शाळेची असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पंतप्रधान मोदींच्या 'जन आधार रॅली'ला जाणाऱ्या बसमध्ये एकूण 45 विद्यार्थी होते. या 45 विद्यार्थ्यांपैकी 35 विद्यार्थी अपघातात जखमी झाले आहेत. धरमशाळापासून 45 किमी अंतराजवळ नग्रोटा सुरीयनजवळ समलेता येथे हा बस अपघात झाला. जखमींमध्ये 5 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जात आहेत. यातील काही विद्यार्थ्यांवर तांडा येथील डॉ. राजेंद्र प्रसाद वैद्यकीय महाविद्यालय तर काही विद्यार्थ्यांना प्रथोमोपचारासाठी नाग्रोटा सुरीयन येथे दाखल करण्यात आले आहे. यातील दहा विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. 

दरम्यान, या बस अपघातानंतर बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. पुढील तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: 35 students injured in school bus accident in Himachal Kangra

टॅग्स