
भारताने २०२० मध्ये २६७ चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. सुरक्षा, डाटा प्रायव्हसी आणि गलवान व्हॅलीतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने तेव्हा निर्णय घेतला होता. पण आता त्यातील काही अॅप्स आता पुन्हा प्ले स्टोअरवर दिसत आहेत. किमान ३६ अॅप्स प्ले स्टोअरवर जसे आहेत तसे किंवा नव्या नावाने, रिब्रँडिंग करून पुन्हा उपलब्ध झाले आहेत. काही अॅप्सने रिब्रँडिंग केले गेलेय तर काहींनी मालकी हक्क बदलले आहेत. कायदेशीररित्या अॅप्स चालवता यावेत यासाठी भारतीय कंपन्यांशी करार करण्यात आले आहेत.