Delhi Violence : दिल्ली हिंसाचारात 38 जणांचा मृत्यू; पण सध्या परिस्थिती...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

ढिगाऱ्यांखाली सापडताहेत मृतदेह

- गोळीबारातील मृतांची माहिती नाही

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरु होता. आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. त्यानंतर आता दिल्लीतील हा हिंसाचार काही प्रमाणात शांत झाला आहे. मात्र, या हिंसाचारात 38 जणांचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजधानी दिल्लीत कोणताही अनुचित प्रकार गुरुवारी घडला नाही. मात्र, या परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव आहे. परंतु बँका, दुकाने, बाजारपेठा आणि शाळा बंदच आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या हिंसाचारात आत्तापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला तर जखमींची संख्याही वाढली आहे. आता ही संख्या 250 वर गेली आहे. 

ढिगाऱ्यांखाली सापडताहेत मृतदेह

या हिंसाचारात अनेकांचा मृत्यू झाला. यातील काही जणांचे मृतदेह सापडले नाहीत. मात्र, आता यातील अनेकांचे मृतदेह हे गटारे, नाले तसेच ढिगाऱ्यांखाली सापडत आहेत.

गोळीबारातील मृतांची माहिती नाही

गोळीबारात किती जणांचा मृत्यू झाला आणि हिंसाचारात किती जण दगावले याबाबतची माहिती अद्याप मिळत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 38 Peoples died in Delhi Violence