जम्मू-काश्मिरमधील गुरेज येथील चकमकीत चार जवान हुतात्मा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

या कारवाईत मेजर के. पी. राणे, जवान जमी सिंग, विक्रमजीत व मनदीप हे हुतात्मा झाले आहेत. गुरेज सेक्टरमधील गोविंद नल्लाह या भागात ही चकमक झाली.

बंदीपूर : जम्मू-काश्मिरमधील बंदीपूर जिल्ह्यातील गुरेज भागात दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत चार जवान हुतात्मा झाले आहेत. घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या चार दहशतवाद्यांनाही जवानांनी ठार केले, दरम्यान आणखी चार दहशतवादी फरार झाल्याचे कळते. 

या कारवाईत मेजर के. पी. राणे, जवान जमी सिंग, विक्रमजीत व मनदीप हे हुतात्मा झाले आहेत. गुरेज सेक्टरमधील गोविंद नल्लाह या भागात ही चकमक झाली.

आठ दहशतवाद्यांनी या भागात घुसखोरीचा व गोळीबाराचा प्रयत्न केला होता. त्यातील चार दहशतवाद्यांनी मारण्यात जवानांना यश आले, तर चार जण पळून गेले. ही कारवाई अजूनही चालू असून उरर्वरीत दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधकार्य चालू आहे.  

Web Title: 4 army man martyerd in gurej jammu kashmir