पाकच्या राष्ट्रगीताला उभे राहिलेल्या 4 क्रिकेटपटूंना अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 8 जानेवारी 2018

बंदिपुरा जिल्ह्यातील अरीन गावात क्रिकेट सामन्यापूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रगीत लावण्यात आले. या राष्ट्रगीताला संघातील सर्व खेळाडू उभे राहिले होते. या प्रकरणी कारवाई करत चार क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बंदिपुरा जिल्ह्यात एका क्रिकेटसामन्यादरम्यान लावण्यात आलेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेल्या चार क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदिपुरा जिल्ह्यातील अरीन गावात क्रिकेट सामन्यापूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रगीत लावण्यात आले. या राष्ट्रगीताला संघातील सर्व खेळाडू उभे राहिले होते. या प्रकरणी कारवाई करत चार क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन कोण होते आणि याचा व्हिडिओ कोणी प्रसिद्ध केला याचा शोध घेण्यात येत आहे.

यापूर्वी 2016 मध्ये गंदेरबाल जिल्ह्यात पाकिस्तानच्या राष्ट्रगीतावेळी स्थानिक क्रिकेटपटू सलाम करताना दिसून आले होते. आता राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ क्रिकेटपटू उभे राहिल्याचे दिसून येत आहे. तीन जानेवारीला या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ 'पाक सरजमीन' हे राष्ट्रगीत सुरु असल्याचे ऐकू येत आहे.

Web Title: 4 Cricketers In Jammu And Kashmir Arrested For Respecting Pakistan National Anthem