esakal | ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के; 4 कॅबिनेट मंत्रीही भाजपच्या गळाला?
sakal

बोलून बातमी शोधा

mamata banerjees cabinet meeting , West Bangal, BJP,TMC

ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के; 4 कॅबिनेट मंत्रीही भाजपच्या गळाला?

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. तृणमूलचे दिग्गज नेते पक्ष सोडणार असल्याची चर्चा रंगत असताना ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी बोलवलेल्या कॅबिनेट बैठकीला 4 मंत्र्यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. पक्षाचे सरचिटणीस पार्थ चटर्जी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, तीन मंत्र्याची अनुपस्थिती वास्तविक कारण दिसत असली तरी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्या गैर हजरीचे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. पक्षपाताच्या मुद्यावरु ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा रंगली असून कॅबिनेट बैठकीला दांडी मारल्यानंतर ते पक्षाला रामराम करण्याची चर्चा आणखी जोर धरु लागली आहे.   

नोव्हेंबरमध्ये कोलकाता येथील सार्वजनिक बैठकीत  बॅनर्जी यांनी पक्षात दुजाभाव होत असल्याचा आरोप केला होता. पक्षात प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्याची संस्कृती दिसत आहे. ही बाब निराशजनक आहे. राजीव बॅनर्जी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले होते.  

अमित शहा यांनी ‘ढोकळा पार्टी’ द्यावी; ममता बॅनर्जी यांचा टोमणा

मंगळवारी झालेल्या बैठकीत अनुपस्थितीत राहिलेल्या मंत्र्यांमध्ये  पर्यटन मंत्री गौतम देब आणि उत्तर बंगाल विकास मंत्री रवींद्रनाथ घोष यांचाही समावेश होता. घोष यांनी सरकारी सेवा जनतेपर्यंत पोहचवण्यात व्यस्त असल्याचे कारण दिले होते. दार्जिलिंग जिल्ह्यातील  पर्यटन मंत्री गौतम देब यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे तर बीरभूमच्या चंद्रनाथ सिन्हा यांनी मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांच्या आगमी दौऱ्याच्या तयारीत व्यस्त असल्याचे म्हटले होते.  

 एक हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणी केंद्रीय मंत्र्यासह 14 जणांना नोटीस

पुढील चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या 294 जागेसाठीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनेही चांगलीच तयारी सुरु केली आहे. पश्चिम बंगालमध्ये 200+ जागा मिळवून तृणमूल काँग्रेसचा गड उद्धवस्त करण्याचा मानस भाजपने ठेवला आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांनी यापार्श्वभूमीवर दौरेही सुरु केले आहेत.