काश्‍मीरमध्ये हिमस्खलन; चार जवान मृत्युमुखी

वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

उत्तर काश्‍मीरच्या नियंत्रण रेषेनजीक हिमस्खलनाच्या दोन घटनांत चार जवानांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात सियाचिनमध्ये हिमस्खलन होऊन चार जवानांसह सहा जण मृत्युमुखी पडले होते.

श्रीनगर : उत्तर काश्‍मीरच्या नियंत्रण रेषेनजीक हिमस्खलनाच्या दोन घटनांत चार जवानांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात सियाचिनमध्ये हिमस्खलन होऊन चार जवानांसह सहा जण मृत्युमुखी पडले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

कुपवाडाच्या तंगधर भागात मंगळवार दुपारपासूनच लष्कराची चौकी हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडली होती. त्यात चार जवान अडकले होते. हिमस्खलनाची माहिती कळताच मदतकार्य सुरू केले. त्यात तीन जवानांचे मृतदेह हाती लागले असून, एका जवानाला वाचवण्यात यश आले. अन्य दुसऱ्या घटनेत बांदीपुरा जिल्ह्यात गुरेज सेक्‍टरच्या दावर भागात गस्त घालणारे जवान हिमस्खलनात सापडले. त्यात दोन जवान अडकले होते. यात एकाला वाचवण्यात यश आले, तर दुसऱ्या जवानाचा मृतदेह तपासादरम्यान सापडला.

काय घडलं बैठकीत? ज्यानंतर अजित पवारांनी बंड केलं

काश्‍मीरमध्ये तापमानात किंचित सुधारणा
दोन दिवसाच्या कडक थंडीनंतर आज तापमानात सुधारणा झाल्याने जम्मू आणि काश्‍मीरसह लडाख भागातील नागरिकांना दिलासा मिळाला. लेह येथे नीचांकी तापमान नोंदले असून, त्यात 2.8 अंशांने सुधारणा होऊन ते उणे 12.8 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. श्रीनगरमध्ये उणे 2.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. काल उणे 3 अंश तापमान होते. जम्मूच्या नागरिकांनी कालची कडाक्‍याची थंडी अनुभवल्यानंतर आज सकाळी काही प्रमाणात दिलासा मिळाला. तेथे तापमान 7.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पहेलगाम हे सर्वांत थंड ठिकाण म्हणून नोंदले गेले असून, तेथे उणे 6.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 soldiers killed by snow avalanche in Kashmir