कुपवाडामध्ये चार दहशतवाद्यांना अटक

वृत्तसंस्था
रविवार, 26 ऑगस्ट 2018

अल बद्र या दहशतवादी संघटनेत सहभागी झालेले हे सर्वजण एलओसी पार जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. या दहशतवाद्यांशी थोडावेळ चकमक झाल्यानंतर त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा भागात आज (रविवार) सकाळी सुरक्षा रक्षकांना एका चकमकीनंतर चार दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हंदवाडा येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहिम सुरु केली. यावेळी या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. हे सर्वजण एका नव्या दहशतवादी संघटनेत नुकतेच सहभागी झाले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) पार करून जाण्याच्या तयारीत सर्वजण होते.

अल बद्र या दहशतवादी संघटनेत सहभागी झालेले हे सर्वजण एलओसी पार जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. या दहशतवाद्यांशी थोडावेळ चकमक झाल्यानंतर त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. मात्र, तीन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: 4 terrorists arrested after encounter with security forces in Kupwara districts Handwara