सीआरपीएफच्या 400 जवानांना विषबाधा

400 CRPF jawans fall ill due to suspected food poisoning
400 CRPF jawans fall ill due to suspected food poisoning

तिरुअनंतपुरम (केरळ) - केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) 400 जवानांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची सीआरपीएफकडून चौकशी करण्यात येत असून अन्नाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत.

प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या जवानांना शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर त्रास जाणवू लागला. माश्‍यांचा समावेश असलेल्या जेवणानंतर जवानांना पोटदुखी आणि उलटीचा त्रास जाणवू लागला, अशी माहिती वृत्तसंस्थेशी बोलताना सीआरपीएफचे महासंचालक सुदीप लखाटिया यांनी दिली. "जवानांना देण्यात आलेले जेवण बनविण्यासाठी वापरण्यात आलेले पदार्थ कोठून आणण्यात आले होते, याचा आम्ही शोध घेत आहोत. प्राथमिक चौकशीमध्ये मासे खराब नसल्याचे दिसून आले आहे. प्रशिक्षण केंद्राद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे', असे लखाटिया यांनी सांगितले.

जवानांना त्रास जाणवू लागल्यानंतर तातडीने प्रशिक्षण केंद्रामध्ये प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. तर 200 जवानांना तिरुअनंतपुरम येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जवानांची प्रकृती गंभीर नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com