दिल्लीतील पेट्रोल पंपांचा संप हा भाजप पुरस्कृतच : केजरीवाल

petrol
petrol

दिल्ली : राजधानी दिल्लीत इंधनाच्या किंमतीवरील व्हॅट कमी करण्यास दिल्लीतील केजरीवाल सरकारने नकार दिल्यामुळे पेट्रोल पंप व सीएनजी पंप चालकांनी संप पुकारला आहे. दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सुरू केलेल्या या संपात दिल्लीतील 400 पेट्रोल पंप या संपात सहभागी आहेत. तर, हा संप भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. आम्हाला खासगीत ही माहिती मिळाल्याचेही केजरीवाल यांनी म्हणले आहे.

दिल्लीतील 400 पेट्रोल पंपांना सीएनजी स्टेशन जोडलेली आहेत. या सर्व पंपांनी व्हॅट कमी न करण्याच्या निर्णयामुळे दिल्ली सरकारविरोधत संप पुकारला आहे. हे सर्व पेट्रोल पंप 24 तासांसाठी बंद राहतील. हे सर्व पंप 22 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजल्यापासून ते 23 ऑक्टोबरला सकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहतील. यात ग्राहकांचे नुकसान होणार असून त्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल. 

दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष निश्चल सिंघानिया यांनी सांगितले की, केंद्र सरकारने 4 सप्टेंबरला पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कासह 2.50 रूपये लीटर दरकपात केली होती. त्यानंतर इतर राज्यातील सरकारने त्यांचा व्हॅट कमी करून या किंमतीत पाच रूपयाची कपात केली होती. मात्र दिल्ली सरकारने व्हॅट कमी करण्यास नकार दिला. त्यामुळे दिल्लीताल लोक इतर राज्यातील पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरत आहेत. यामुळे आमचे नुकसान होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com