

Night-Long Rescue Mission as 400 Tourists Get Stuck in Aerial Cable Car Disaster
sakal
- जावेद मात्झी
श्रीनगर: उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील प्रसिद्ध गुलमर्ग गोंडोला या केबल कारमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे ४०० पर्यटक केबल कारच्या केबिनमध्ये अडकून पडले होते. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरक्षा दलांनी बचावकार्य करत सर्वांची सुखरूप सुटका केली. जम्मू-काश्मीरचे नायबराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून होते. तर पोलिस महासंचालक नलिन प्रभात आणि विशेष पोलिस महासंचालक (समन्वय) सय्यद जावेद गिलानी हे वरिष्ठ पोलिस व नागरी प्रशासन अधिकाऱ्यांच्या पथकासह घटनास्थळी तळ ठोकून होते.