रेल्वे प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! 42 प्रवासी गाड्या अनिश्चित काळासाठी रद्द

Indian Railway
Indian Railwayesakal
Summary

भारतात ट्रेन ही जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेनं प्रवास करत असतात.

Indian Railway Cancelled Train : रेल्वे प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! भारतात ट्रेन ही जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी प्रवासी ट्रेनचा (Passenger Train) वापर करतात. अशा परिस्थितीत प्रवासी काही महिने आधीच ट्रेनचे आरक्षण करतात. पण, काहीवेळा खराब हवामान, रुळ दुरूस्ती यामुळं ट्रेन रद्द कराव्या लागतात. त्यामुळं प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

देशातील कोळशाची टंचाई लक्षात घेता, तसेच अनेक राज्यांत विजेचा तुटवडा जाणवू लागल्यानं कोळशाच्या गाड्या जलद गतीनं इच्छितस्थळी जाव्यात, यासाठी देशातील सुमारे 42 प्रवासी गाड्या रद्द (Passenger Trains) करण्यात आल्या आहेत. यामुळं प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रेल्वेतील (Railway) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एका महिन्यासाठी 670 प्रवासी गाड्या (Train) रद्द करण्याची शक्यता आहे.

Indian Railway
Congress : काँग्रेस नेते कमलनाथ यांचा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा

भारतीय रेल्वेचे कार्यकारी संचालक गौरव कृष्ण बन्सल (Gaurav Krishna Bansal) यांनी ब्लूमबर्गशी बोलताना सांगितलं की, गाड्या रद्द करणं हे तात्पुरतं आहे. परिस्थिती सामान्य होताच प्रवासी सेवा पूर्ववत केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिलीय. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, 24 मे पर्यंत 670 प्रवासी गाड्या रद्द कराव्या लागतील. यामध्ये 500 पेक्षा जास्त गाड्या लांब पल्ल्याच्या असतील. कोळशानं भरलेल्या दररोज 400 हून अधिक गाड्या धावत आहेत. कोळशाची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळशाच्या वाहतुकीसाठी दररोज 415 मालवाहतूक गाड्यांचा पुरवठा करण्याचा निर्धार रेल्वेनं केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com