हिमाचल प्रदेशात बस अपघातात 45 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

शिमला (हिमाचल प्रदेश)- नेरवा भागामध्ये खासगी बसला आज (बुधवार) सकाळी झालेल्या अपघातामध्ये 45 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी बसमधून 56 नागरिक प्रवास करत होते. नेरवा भागात बस आल्यानंतर ती पुलावरून खाली कोसळली. यावेळी झालेल्या अपघातात 45 जणांचा मृत्यू झाला. बस अपघाताचे कारण समजू शकले नाही. बस अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस व बचाव दलाचे पथक घटनास्थळी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिमलाचे पोलिस अधिक्षक डी. डब्ल्यू. नेगी यांनी सांगितले की, 'अपघातग्रस्त बस उत्तराखंडमधील आहे. या बसमध्ये 56 प्रवासी होते. बस नदीत कोसळल्यामुळे 45 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना पोलिसांनी तत्काळ बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.'

Web Title: 44 killed in bus accident in Himachal Pradesh