Cholera Symptoms : मेडिकल कॉलेजच्या 47 विद्यार्थिनी अचानक पडल्या आजारी; कॉलराचा संशय बळावला

बीएमसीआरआय वसतिगृहात किमान स्वच्छता नसल्याबद्दल विद्यार्थ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत.
Cholera Symptoms
Cholera Symptomsesakal
Summary

महिला आयोगाच्या (Women Commission) अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी भेट देऊन विद्यार्थिनींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

बंगळूर : बंगळूर मेडिकल कॉलेज (Bangalore Medical College) अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (बीएमसीआरआय) वसतिगृहातील ४७ विद्यार्थिनी अचानक आजारी पडल्या आणि त्यांना व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोन विद्यार्थिनींना कॉलरा झाल्याचे आढळून आले आहे.

उलट्या आणि जुलाबाचा त्यांना त्रास झाला. डॉक्टरांनी कॉलराच्या संशयित विद्यार्थिनींचे नमुने पाठवले आणि त्यापैकी दोन विद्यार्थिनींना कॉलरा (Cholera Symptoms) आढळून आला. महिला आयोगाच्या (Women Commission) अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी भेट देऊन विद्यार्थिनींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Cholera Symptoms
Frozen Shoulder Symptoms : फ्रोझन शोल्डरपासून मिळवा मुक्ती, फिजिओथेरपीमुळे पुनश्‍च येई शक्ती।

नागलक्ष्मी चौधरी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, बीएमसीआरआय वसतिगृहात किमान स्वच्छता नसल्याबद्दल विद्यार्थ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. आठवडाभरात अहवाल देऊन समस्या सोडवण्यास सांगितले आहे. व्हिक्टोरिया रुग्णालयातील जेवण विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात जाते.

Cholera Symptoms
Learning Disorder Symptoms : शैक्षणिक अक्षमता ही एक मानसिक स्थिती आहे, यासाठी ठराविक उपचार नाहीत; कशी असतात लक्षणे?

ही बाब वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. विद्यार्थींनींपैकी २८ ट्रॉमा केअर सेंटरमध्ये, १३ एच ब्लॉकमध्ये आणि तीन आयसीयुमध्ये आहेत. विद्यार्थिनींचा अहवाल उद्या मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंडळाने वसतिगृहातील पाण्याची तपासणी करण्याचे निर्देश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com