माता तू न वैरिणी; बाळाला भोकसून मारले

वृत्तसंस्था
Wednesday, 30 September 2020

'माता तू न वैरिणी' या म्हणीचा प्रत्येय येथे आला असून, फक्त दोन दिवसांच्या बाळाला तब्बल 100 वेळा स्क्रूड्रायवरने भोकसून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन वेगवेगळ्या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

भोपाळ (मध्य प्रदेश) : 'माता तू न वैरिणी' या म्हणीचा प्रत्येय येथे आला असून, फक्त दोन दिवसांच्या बाळाला तब्बल 100 वेळा स्क्रूड्रायवरने भोकसून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन वेगवेगळ्या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Video: प्रपोज राहिलं बाजूला; तोंडावरच बसली लाथ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या बाळाचा मृतदेह एका शिवमंदिराच्या आवारात असल्याची माहिती समजली. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक बाळ कपड्यात गुंडाळलेले आढळून आहे. बाळाच्या शरीरावर खोलवर 100 जखमा होत्या. शिवाय, कुत्र्यांनी लचके तोडले होते. मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठविण्यात आला आहे. बाळाच्या आईचा शोध सुरू आहे.

...म्हणून नवरी झाली विवाहापूर्वीच व्हायरल

दरम्यान, गेल्या 15 दिवसांमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या बाळांचा जीव घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. 17 सप्टेंबर रोजी याच भागामध्ये एका आईने आपल्या एका महिन्याच्या मुलीला पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून मारले होते. या प्रकरणात आईने पोलिस व कुटुंबाची दिशाभूल करण्याचा खूप प्रयत्न केला होता. तिने मुलगा न झाल्याने 1 महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आणि तुरुंगात पाठविले. तिसरी घटना 18 सप्टेंबर रोजी घडली होती. भोपाळच्या एका मोठ्या तलावामध्ये प्रियकरासह आईने आपल्या 9 महिन्यांच्या मुलीला तळ्यात फेकले होते. पाण्यात बुडून या 9 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे ओळख पटवत प्रियकरासह आईला अटक करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 48 hours old baby girl thrown in temple at bhopal