गुजरातध्ये भाजपला धक्का! 5 नेत्यांची अपक्ष निवडणूक लढवण्याची धमकी; कारण...

Amit Shah Narendra Modi
Amit Shah Narendra ModiSakal

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पक्षाचे एक विद्यमान आमदार आणि चार माजी आमदारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची धमकी दिली आहे. नांदोड (अनुसूचित जमाती राखीव) मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून भाजपचे माजी आमदार हर्षद वसावा यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. (Gujarat Vidhan sabha Election mews in Marathi)

Amit Shah Narendra Modi
New Delhi : नोएडात कुत्रा चावला तर त्याच्या मालकाला महागात जाणार ! प्राधिकरणातर्फे 10 हजारांचा दंड

हर्षद वसावा हे भाजपच्या गुजरात युनिटच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी २००२ ते २००७ आणि २००७ ते २०१२ या काळात तत्कालीन राजपिपला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. नर्मदा जिल्ह्यातील नंदगडची जागा सध्या काँग्रेसकडे आहे. या जागेवरून भाजपने डॉ. दर्शन देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.

या घोषणेमुळे नाराज झालेल्या हर्षद वसावा यांनी भाजपमधील आपल्या पदाचा राजीनामा देत शुक्रवारी नंदोडच्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

Amit Shah Narendra Modi
Vasantdada Patil : एका लग्नासाठी जिल्हापरिषदेच्या बदलीचा नियम तडकाफडकी बदलणारे वसंतदादा पाटील

सध्या असली भाजप आणि नकली भाजप आहे," असं वसावा यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला सारून नवोदितांना महत्त्वाची पदे दिली आहेत. मी माझा राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. २००२ ते २०१२ या काळात आमदार म्हणून मी किती काम केले आहे, हे या भागातील जनतेला माहिती आहे,' असेही ते म्हणाले. शेजारच्या वडोदरा जिल्ह्यातील एक विद्यमान आणि दोन माजी आमदारही तिकीट न मिळाल्यामुळे पक्षावर नाराज आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com