शहडोलमध्ये भीषण अपघात; पिकअप उलटून 5 ठार, 30 हून अधिक जखमी

Shahdol Accident
Shahdol Accidentesakal
Summary

शहडोल इथं शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघात झालाय.

शहडोल : शहडोल (Shahdol) इथं शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघात झालाय. इथं 42 वऱ्हाडींनी भरलेली पिकअप उलटून 5 जणांचा मृत्यू झालाय. जयसिंहनगरच्या डोहका गावातून (Dohka village) ही वऱ्हाडी मंडळी पिकअप घेऊन देवलोंडला जात होती, असं सांगण्यात येतंय. या अपघातात 30 हून अधिक जखमी झाले असून त्यापैकी दहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

बेउहरी पोलीस स्टेशन (Beohari Police Station) हद्दीतील तिहकी गावाजवळ ही घटना घडलीय. या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सर्व जखमींवर बेउहरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच एडीजीपी डीसी सागर, जिल्हाधिकारी वंदना वैद्य यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

Shahdol Accident
काही लोक 'अग्निपथ'च्या विरोधात गैरसमज पसरवत आहेत : राजनाथ सिंह

या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी सीएमओच्या ट्विटर हँडलवरून दुःख व्यक्त केलंय. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, शहडोलमध्ये वऱ्हाडींनी भरलेलं वाहन उलटल्यानं अनेक नागरिकांचा मृत्यू झालाय. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना लवकरात लवकर बरं करावं, अशी प्रार्थना त्यांनी केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com