कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात; पाच जण जागीच ठार तर, १८ गंभीर

टीम ई सकाळ
Sunday, 19 July 2020

लखनऊ-आग्रा महामार्गावर एका बसचा आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, १८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

नवी दिल्ली : लखनऊ-आग्रा महामार्गावर एका बसचा आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, १८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ही बस बिहारहून दिल्लीकडे निघाली होती. उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथे लखनऊ-आग्रा महामार्गावर हा अपघात घडला आहे. हा अपघात आज (ता. १९) रविवार सकाळी झाला असून जवळपास ४० ते ५० जण या बसमध्ये प्रवास करत होते. अपघातामधील जखमींनी कन्नौज येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि इटावा येथील सैफई येथे दाखल करण्यात आले आहे. ही बस बिहारहून कामगारांना घेऊन दिल्लीकडे जात होती.

-----------
उत्तर भारताला पावसाचा जोरदार तडाखा; आसाममध्ये पूर
------------
राजस्थानच्या राजकारणात नवा ट्विस्ट; गृह खात्याने मागितले फोन टॅपिंग प्रकरणाचे रिपोर्ट
-------------

दरम्यान, कन्नौजच्या सौरीख जवळ समोर उभ्या असलेल्या एका कारला भरधाव वेगात असलेली ही बस धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनं महामार्गावरून खाली येऊन पडली. अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. नंतर काही वेळातच अपघाताची माहिती मिळताच पोलीसदेखिल घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 killed, 18 injured after bus hits stranded SUV on Lucknow-Agra Expressway