धक्कादायक ! रिक्षाचालकाकडून पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार

वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

हैदराबाद आणि उन्नाव प्रकरणाने देश हादरलेला असताना बिहारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चक्कर मारून आणण्याच्या बहाण्याने एका ऑटोचालकाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी घडली. हा प्रकार सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खारुआ मोरे भागात घडला. आरोपी ऑटोचालकास रात्री उशिरा अटक करण्यात आली. 

दरभंगा (बिहार) : हैदराबाद आणि उन्नाव प्रकरणाने देश हादरलेला असताना बिहारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चक्कर मारून आणण्याच्या बहाण्याने एका ऑटोचालकाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी घडली. हा प्रकार सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खारुआ मोरे भागात घडला. आरोपी ऑटोचालकास रात्री उशिरा अटक करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

काल (ता.०६) सायंकाळी पीडित मुलगी अन्य दुसऱ्या मुलीसमवेत घराबाहेर अंगणात खेळत होती. त्याच वेळी तेथे एक ऑटोचालक आला. तिला ऑटोत चक्कर मारण्याच्या बहाण्याने ऑटोत बसविले आणि एक किलोमीटर अंतरावर निर्जनस्थळी नेले. तेथे नराधम ऑटोचालकाने तिच्यावर अत्याचार केला.

पाच वर्षानंतर पुन्हा जळाला संसार; पुण्यातील महिलेची करुण कहाणी

यादरम्यान तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. जेव्हा पीडितेचे कुटुंबीय लक्ष्मीपूर गावानजीक एका बागेत पोचले तेव्हा तेथे ऑटो उभा दिसला. तेव्हा पीडित मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिला तातडीने दवाखान्यात दाखल केले आणि उपचार सुरू केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीच्या तपासार्थ पथके रवाना केली. रात्री उशिरा आरोपीला अटक केली. दरम्यान, दरभंगातील अत्याचारप्रकरणी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याने राजद नेते लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांनी टीका केली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 year old raped by auto rickshaw driver in Bihar