जगभरात पाच वर्षांत  530 पत्रकारांचा बळी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

जगभरात गेल्या पाच वर्षांत पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे युनेस्कोच्या अहवालात म्हटले आहे. 2012 ते 2016 या काळात अशा घटनांत 530 पत्रकारांचा मृत्यू झाला असून भारतात 18 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. 

नवी दिल्ली -  जगभरात गेल्या पाच वर्षांत पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे युनेस्कोच्या अहवालात म्हटले आहे. 2012 ते 2016 या काळात अशा घटनांत 530 पत्रकारांचा मृत्यू झाला असून भारतात 18 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. 

जागतिक माध्यम स्वातंत्र्यदिनानिमित्त आज हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. सन 2007 ते 2011 या काळात 316 पत्रकारांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांत तब्बल 67 टक्के वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. सीरियात सर्वाधिक म्हणजे 86 पत्रकारांचा बळी गेला. त्याखालोखाल इराक (46), मेक्‍सिको (37), सोमालिया (36), पाकिस्तान (30), ब्राझील (29), येमेन (21), अफगणिस्तान (20), होंडारूस (19), भारत (18), लीबिया (17), तर बांगलादेशात दहा पत्रकारांचा बळी गेला आहे. 
 

Web Title: 530 journalist dead in Five years