विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात झारखंडमध्ये 58 टक्के मतदान

58 percent votes cast in second phase of polling in Jharkhand
58 percent votes cast in second phase of polling in Jharkhand

रांची : झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 58.8 टक्के मतदान झाले. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात एक नागरिक ठार झाला. नक्षलवाद्यांच्या कारवायाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी सात वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली होती. वीसपैकी 18 मतदारसंघांतील मतदान दुपारी तीन वाजता संपले, तर जमेशदपूर (पूर्व) आणि जमशेदपूर (पश्‍चिम) येथे पाच वाजेपर्यंत मतदान झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

सात जिल्ह्यांतील 20 मतदारसंघांत आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. यासाठी सुमारे 42 हजार जवान तैनात करण्यात आले होते. यानुसार 260 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. त्यात 29 महिलांचा समावेश होता, तर 73 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सिसाई मतदारसंघात 36 क्रमाकांच्या बूथबाहेर बंदोबस्तासाठी असलेल्या रॅपिड ऍक्‍शन फोर्सच्या जवानाची बंदूक हिसकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर गोळीबार करण्यात आला. त्यात तो ठार झाला.

दोन्ही पायांनी अपंग; पण पाहा कशी चोरी करतो

या घटनेमुळे संबंधित बुधवारची मतदान प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे मतदान केंद्र अधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अन्य एका घटनेत पश्‍चिम सिंघभूम जिल्ह्यात चैसाबा मतदारसंघात नक्षलवाद्यांनी जोजो हातू गावाजवळ रिकामी बस पेटवून दिली. बहारागोरा आणि चैसाबा मतदारसंघात थंडीतही मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते. झारखंड विधानसभेचा निकाल 23 डिसेंबरला लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com