esakal | भाजपचे आमदार गुजरातमध्ये; राजस्थान राजकिय संघर्षाला वेगळे वळण?
sakal

बोलून बातमी शोधा

BJP MLA in Gujrat

राजस्थानमधील राजकीय संघर्षाला एक वेगळेच वळण लागलेले पाहायला मिळत आहे. (Rajasthan Political Crisis) राजस्थानमध्ये १४ ऑगस्टला विधानसभेचे अधिवेशन सुरु होणार असून अधिवेशनापूर्वीच भाजपचे सहा आमदार काल (ता. ०८) शनिवारी गुजरामधील पोरबंदरमध्ये पोहोचले आहेत.

भाजपचे आमदार गुजरातमध्ये; राजस्थान राजकिय संघर्षाला वेगळे वळण?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पोरबंदर : राजस्थानमधील राजकीय संघर्षाला एक वेगळेच वळण लागलेले पाहायला मिळत आहे. (Rajasthan Political Crisis) राजस्थानमध्ये १४ ऑगस्टला विधानसभेचे अधिवेशन सुरु होणार असून अधिवेशनापूर्वीच भाजपचे सहा आमदार काल (ता. ०८) शनिवारी गुजरामधील पोरबंदरमध्ये पोहोचले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

एका चार्टर्ड विमानाने ते पोरबंदर येथे आले असून एका आमदाराने सांगितले आहे की, भारतीय जनता पक्षाचे राजस्थानमधील आणखी काही आमदार येथे येणार आहेत. भाजप आमदार निर्मल कुमावत यांनी पत्रकारांना बोलताना राजस्थानमधील काँग्रेस सरकार (Ashok Gehlot Government) विरोधी पक्षाला धमक्या देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही मानसिक शांतिसाठी सोमनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गुजरातमध्ये आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू

कुमावत यांनी सांगिते की, काँग्रेसमध्ये गटबाजीचे राजकारण हे गेल्या एक महिन्यापासून चालू आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारकडे बहुमत नाही. ते भाजप आमदारांना दबावतंत्राचा वापर करुन धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस सरकारकडून प्रशासनाचा आधार घेऊन चालू असलेल्या धमक्यांपासून मनशांती मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण सोमनाथ मंदिराच्या दर्शनासाठी आलो असून राजस्थानमधून आणखी काही आमदार गुजरातमध्ये येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. आम्ही येथे स्वतःला काँग्रेस सरकारपासून वाचविण्याकरिता आलो असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील दोन दिवस गुजरातमध्ये थांबण्याचा विचार असल्याचेही यावेळी एका आमदाराने सांगितले, याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

दरम्यान, राजस्थानमध्ये १४ ऑगस्ट रोजी विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. काँग्रेसचेअशोक गेहलोत समर्थक आमदार (Ashok Gehlot) हे जैसलमेरमधील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. तर काँग्रेस विरोधात बंडखोरी करणारे सचिन पायलट समर्थक आमदार हे हरियाणामध्ये थांबले असल्याचे सांगण्यात येत आहे.