Gas Leak: पंजाबमध्ये गॅस गळती दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, काही जणांची प्रकृती गंभीर

पंजाबमधील लुधियानामध्ये रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली.
 dead  a gas leak incident in Punjab Ludhiana dro95
dead a gas leak incident in Punjab Ludhiana dro95

पंजाबमधील लुधियानामध्ये रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. ग्यासपुरा परिसरात गॅस गळतीमध्ये ११ जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर काही जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखलं झाले. (6 dead in a gas leak incident in Punjab Ludhiana )

मिळालेल्या माहितीनुसार, ‘गोयल मिल्क प्लांट’ नावाच्या कारखान्यामध्ये गॅस गळती झाली आहे. या कारखान्यात बड्या कंपन्यांचे दुग्धजन्य पदार्थ स्टोअर केले जातात. त्यानंतर त्याचा पुढे पुरवठा केला जातो.

प्राथमिक माहितीनुसार दुग्धजन्य पदार्थ थंड करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅसची गळती झाली आहे. गॅस गळतीमुळे कारखान्यापासून 300 मीटर परिघात राहणाऱ्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. पोलीस सध्या कारखान्याजवळ असून गॅस गळतीचे कारण शोधले जात आहे. पोलिसांनी व्यवस्थापकांशीही संपर्क साधला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com