आंध्रप्रदेश : औषध कंपनीला आग, ६ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर

Andhra Pradesh Pharma Company Fire
Andhra Pradesh Pharma Company FireANI

अमरावती : आंध्र प्रदेशातील औषधाच्या एका कंपनीत गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग (Andhra Pradesh Pharma Company Fire) लागली. एलुरु जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथे ही घटना घडली असून यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांपैकी चार जण बिहारमधील (Bihar) स्थलांतरीत कामगार होते.

Andhra Pradesh Pharma Company Fire
भारतात मानवाधिकारांचं उल्लंघन? अमेरिकेच्या अहवालावर जयशंकर यांची प्रतिक्रिया

एलुरु जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथील औषधनिर्माण कंपनीमध्ये गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यावेळी रात्रपाळीचे कामगार काम करत होते. अचानक आग लागल्याने कामगारांनी पळ काढला. तरीही सहा जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तसेच १२ जण गंभीर जखमी झाले. मृतांपैकी ४ जण बिहारमधील स्थलांतरीत मजूर होते. वायू गळतीमध्ये ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्यानंतर अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर जवळपास दोन तासांत आग आटोक्यात आली.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी आगीच्या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तसेच प्रत्येक गंभीर कामगाराला ५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना २ लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी या कामगारांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दिल्या. तसेच पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com