पतीला गोवण्यासाठी आईनेच केली मुलीची हत्या, बनाव ऐकून थक्क व्हाल!

crime
crime sakal

उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये 6 वर्षांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. एका आईने आपल्या 6 वर्षींच्या मुलीची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून दिला. पोलिसांनी महिलेला अटक करून संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. आश्चर्य म्हणजे पतीला गोवण्यासाठी महिलेने पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. पतीला या प्रकरणात अडकवण्याचा या महिलेचा प्रयत्न होता.

दोन लग्न, चार मुली

12 नोव्हेंबरला नोएडाच्या सेक्टर-93 मध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. तपासात मुलीचे नाव नेहा शर्मा असल्याचं समोर आलं. मुलगी फक्त 6 वर्षांची होती.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. अनुराधा असे या महिलेचे नाव असून ती अलीगढची रहिवासी आहे. ती नोएडातील सेक्टर 93 मध्ये वास्तव्यास होती. नोएडा पोलिसांनी संबंधित माहिती दिली आहे.

मृताची आई अनुराधा आणि रामकुमार यांचा विवाह झाल्याचे तपासात समोर आले आहे. दोघांना चार मुली आहेत. पण रामकुमारने 2010 मध्ये दुसरे लग्न केले. दोघेही दोन-दोन मुलींसह राहू लागले.

आधी जंगल, मग मेडिकल... पोलिसांनी लावला छडा!

राजकुमार यांचा नोएडा सेक्टर-९३ मध्ये फ्लॅट आहे. त्याला तो घरच्यांना द्यायचा होता. याचवेळी अनुराधाला वाटलं की आपण आपल्या मुलीची हत्या करून पतीला गोवल्यास त्याला तुरुंगवास होईल. आणि त्याच्या फ्लॅटचा ताबा घेता येईल. याच कारणावरून अनुराधाने आपल्या मुलीला निर्जनस्थळी नेऊन गळा आवळून खून केला. यानंतर ती औषध घेण्याच्या बहाण्याने ग्रेटर नोएडा येथे गेली आणि नंतर गायब झाली. पोलिसांनी महिलेचा शोध घेऊन चौकशी केली. यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com