esakal | विमान प्रवासात ६० टक्क्यांनी वाढ; दिल्ली, दुबईला जाणाऱ्यांची संख्या अधिक
sakal

बोलून बातमी शोधा

aeroplane

विमान प्रवासात ६० टक्क्यांनी वाढ; दिल्ली, दुबईला जाणाऱ्यांची संख्या अधिक

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेला कोरोनाचा कहर सध्या ओसरताना दिसत असून, दुसरी लाटही आटोक्यात आहे. त्यामुळे विमानतळावरील प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये विमानतळावरील प्रवासी तब्बल ६० टक्क्यांनी वाढले आहेत. या कालावधीत दिल्ली आणि दुबईवारी करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. बुधवारी विमानतळाने ३८० विमाने हाताळली, तर मे महिन्यात दिवसाला केवळ १५० विमान उड्डाण होत होते.

हेही वाचा: राज्यातल्या सर्व पोटनिवडणुका स्थगित; आयोगानं दिलं 'हे' कारण

जानेवारी ते जूनदरम्यान मुंबई विमानतळावरून ७२ लाख ६२ हजार १५८ प्रवाशांनी ७७ हजार ७९७ विमान फेऱ्यांतून प्रवास केला. यामध्ये ६४ लाख ८७ हजार ६६ प्रवाशांनी देशांतर्गत, तर सात लाख ७४ हजार ९२ प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय विमानांनी प्रवास केला. यासाठी देशांतर्गत ६३ हजार ९९२ तर आंतरराष्ट्रीय १३ हजार ८०५ विमानांचा वापर केला आहे. निर्बंधांमध्ये शिथिलता मिळाल्याने दुबईला दोन लाख १३ हजार ७०० तर दिल्ली नऊ लाख ४६ हजार ८९० प्रवाशांनी प्रवास केला.

हेही वाचा: मोठी संधी! यंदा TCS कंपनी करणार 40 हजारहून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती

जानेवारी ते जून प्रवासी संख्या

  • देशांतर्गत- ६४,८७,०६६

  • आंतरराष्ट्रीय- ७,७४,०९२

देशांतर्गत प्रवासी

  • दिल्ली- ९,४६,८९०

  • गोवा- ५,४२,३५०

  • बंगळूर- ४,३२,१८०

आंतरराष्ट्रीय प्रवासी

  • दुबई २,१३,७७०

  • नेवार्क- ८८,०१०

  • हिथ्रो- ७५,४७०

loading image