Mob Lynching : मोदींना पत्र लिहिणाऱ्या 'त्या' 49 सेलिब्रिटींना प्रसून जोशी, कंगणाचे उत्तर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जुलै 2019

- 49 सेलिब्रिटींनी मॉब लिंचिंगबाबत पंतप्रधान मोदींना लिहिले होते पत्र.

नवी दिल्ली : देशातील 49 सेलिब्रिटींनी पत्र लिहून वाढत्या मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. त्यानंतर आता यावरून 61 सेलिब्रिटींनी त्याला उत्तर देत खुलं पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले, की जेव्हा नक्षलवादी आदिवासींना लक्ष्य करतात. तेव्हा हे लोक शांत का राहतात?

मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांबाबत 49 सेलिब्रिटींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले. त्यानंतर आता 61 सेलिब्रिटींनी यावर उत्तर देत खुलं पत्र लिहिले. ‘Against Selective Outrage and False Narratives’ असे या पत्राला शिर्षक असे देण्यात आले. हे पत्र लिहिणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये गीतकार प्रसून जोशी, अभिनेत्री कंगना राणावत, वाद्य पंडित विश्वमोहन भट्ट, दिग्दर्शक मधूर भंडारकर आणि विवेक अग्निहोत्री यांचा समावेश आहे.

या 61 सेलिब्रिटींनी लिहिलेल्या पत्रातून विचारणा करण्यात आली, की जेव्हा नक्षलवादी आदिवासींना लक्ष्य करतात. तेव्हा हे लोक शांत का राहतात? जेव्हा काश्मीरमध्ये फुटीरतावादी शाळा बंद केल्या तेव्हा हे लोक कुठे गेले होते? तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) करण्यात आलेल्या घोषणाबाजीवरुनही  प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 61 celebs including Kangana Ranaut Prasoon Joshi pen counter letter on intolerance