62 वर्षीय प्रवाशाकडून विमानातील हवाईसुंदरीचा विनयभंग

वृत्तसंस्था
बुधवार, 28 मार्च 2018

'विस्तारा'तून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने विमानातच हवाईसुंदरीचा विनयभंग केला. विनयभंग केल्यानंतर पीडित हवाईसुंदरीने संबंधित प्रवाशाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत त्याचे नाव 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत शिफारस केली आहे. 

नवी दिल्ली : पुण्यातील रहिवासी असलेल्या 62 वर्षीय प्रवाशाकडून विमानातील हवाईसुंदरीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. 'विस्तारा' या विमान कंपनीच्या विमानात हा प्रकार घडला. हवाईसुंदरीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधित प्रवाशाला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.

Vistara airlines

'विस्तारा'तून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने विमानातच हवाईसुंदरीचा विनयभंग केला. विनयभंग केल्यानंतर पीडित हवाईसुंदरीने संबंधित प्रवाशाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत त्याचे नाव 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत शिफारस केली आहे. अशाप्रकारची शिफारस करणारी ही पहिली व्यक्ती ठरणार आहे. त्यावर विमान कंपन्यानी सांगितले, की याबाबत आम्ही विमान कंपनीला माहिती दिली. याप्रकरणाची चौकशी पूर्ण होऊन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढे काय करायचे याचा निर्णय घेण्यात येईल. सदर प्रवाशाविरोधात कारवाई झाल्यास अश्लिल हावभाव केल्याप्रकरणी 3 महिने आणि आक्षेपार्ह स्पर्श केल्याबद्दल 6 महिनांपर्यंत विमान प्रवासावर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. 

याबाबत विस्तारा विमान कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की ''आमचे केबिन क्रू मेंबर यूके 997 लखनौ ते दिल्ली या विमानातून प्रवास करत असताना त्या प्रवाशाने हवाईसुंदरीचा विनयभंग केला. अशाप्रकराच्या प्रकारांवर विस्तारा विमान कंपनी कदापिही दुर्लक्ष करणार नाही. आम्ही याप्रकरणाची माहिती पोलिस आणि संबंधित विभागाला दिली आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे". 

Web Title: 62 years old man held for molesting Vistara air hostess airline may recommend him for no fly list Aeroplane