
Chandrashekhar Guruji Murder : आधी पाया पडले मग...; हत्येचा ६३ सेकंदाचा थरार!
मुंबई : लोकांच्या जीवनातील समस्या सोडवण्याचा दावा करणाऱ्या 'सरल वास्तू' या सल्लागार कंपनीचे प्रमुख चंद्रशेखर अंगडी ऊर्फ चंद्रशेखर गुरुजी यांची मंगळवारी दोन जणांनी भोसकून हत्या केली. ते मानव गुरु म्हणूनही प्रसिद्ध होते. कर्नाटकातील हुबळी येथील हॉटेल प्रेसिडेंट इथं हा धक्कादायक प्रकार घडला. हा ६३ सेकंदांचा थरार सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाला आहे. (Chandrasekhar Guru assassination)
हेही वाचा: दिल्ली: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे ईडीच्या कार्यालयात दाखल
हॉटेल प्रेसिडंटमध्ये वास्तव्याला असलेल्या मानव गुरुंना भेटण्यासाठी दोन जण आले होते. या आरोपींनी त्यांना लॉबीमध्ये बोलावून घेतलं. मानव गुरु त्यांना भेटण्यासाठी लॉबीमधील एका खुर्चीत विराजमान झाल्यानंतर यातील एक जण त्यांच्यापुढं नतमस्तक झाला. त्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीनं हातातील धारधार हत्यारानं थेट त्यांच्यावर हल्ला चढवला. यानंतर नतमस्तक होण्याचं नाटक करणारा दुसरा तरुणही उठला आणि नंतर दोघांनी मिळून मानव गुरु यांच्यावर अनेक वार केले. हा ६३ सेकंदांचा थरार हॉटेलच्या लॉबीतील सीसीटीव्हीत कैद झाला आहे, अशी माहिती हुबळीच्या पोलीस आयुक्तांनी दिली.
हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं असून यामध्ये मारेकऱ्यांनी मानव गुरुंना बचावाची कोणतीही संधी दिली नाही. अनेक वार झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मृतदेह केआयएमएस रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला. याची चौकशी कर्नाटक पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे.
Web Title: 63 Seconds Thrill Of Chandrasekhar Guru Assassination Captured In Cctv Camera
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..