कर्नाटकात लसीकरण पूर्ण झालेले 66 विद्यार्थी पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना रूग्ण

कर्नाटकात लसीकरण पूर्ण झालेले 66 विद्यार्थी पॉझिटिव्ह

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

बंगळुरू : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे काहीसा दिलासा मिळालेला असताना कर्नाटकमधून एक काहिशी चिंता वाढविणारी बाब समोर आली आहे. कर्नाटकमधील (Karnatak) धारवाड येथील SDM वैद्याकिय महाविद्यालयातील 66 विद्यार्थांचा कोरोना चाचणी आहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या विद्यार्थांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्या सर्वांचे कोरोना लसीचे (Corona Vaccination) दोन्ही डोस पूर्ण झालेले होते.

दरम्यान, या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तातडीने महाविद्यालय इमारतीतील दोन्ही वसतिगृह सील करण्यात केले आहेत. तसेच नियमित होणारे वर्गदेखील काही काळासाठी रद्द करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि त्यानंतरही संक्रमित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विलगीकरण (Quarantine) करण्यात आले आहे, तसेच त्यांच्यावर वसतिगृह परिसरातच उपचार केले जात असल्याची माहिती धारवाडचे उपायुक्त नितेश पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: बूस्टर डोसबाबत कोरोना टास्क फोर्समधील विविध तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे

या महाविद्यालयात एकूण 400 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यातील जवळपास 300 विद्यार्थांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तर, उर्वरित 100 विद्यार्थ्यांचीदेखील कोरोना चाचणी केली जाणार आहे. या सर्व काळात विद्यार्थांना बाहेर जाण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्य़ांचा कोरोना चाचणी आहवाल प्रतिक्षेत आहे त्यांचेदेखील विलगीकरण करण्यात आल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

loading image
go to top