दोन महिन्यांत पाककडून 633 वेळेस शस्त्रसंधीचे उल्लंघन

पीटीआय
बुधवार, 4 एप्रिल 2018

नवी दिल्ली : नवीन वर्षातील पहिल्या दोन महिन्यांतच पाकिस्तानने तब्बल 633 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती आज गृहमंत्रालयाच्या वतीने राज्यसभेत देण्यात आली. त्यात प्रत्यक्ष ताबारेषेवर 432, तर आंतरराष्ट्रीय सीमेवर 201 वेळा पाकिस्तानकडून गोळीबार झाला आहे. या गोळीबारात 12 नागरिक मारले गेले, तर 10 जवान हुतात्मा झाले. 

गेल्या वर्षी पाकिस्तानने 971 वेळेस शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यात प्रत्यक्ष ताबारेषेजवळ 8670, तर आंतरराष्ट्रीय सीमेवर 111 वेळेस शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्यात 12 नागरिक ठार झाले, तर 19 जवान हुतात्मा झाले. 2015 पासून ते फेब्रुवारीपर्यंत 487 दहशतवादी मारले गेले. त्यात या वेळच्या 16 दहशतवाद्यांचा समावेश आहे. 2015 पासून आतापर्यंत झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात 75 नागरिक ठार झाले. त्यात या वेळच्या दोन नागरिकांचादेखील समावेश आहे. 

जानेवारी 2015 ते फेब्रुवारी 2018 पर्यंतच्या घडामोडी 
216 

जवान हुतात्मा 

923 
दहशतवादी कारवाया 

Web Title: 663 ceasefire violations from Pakistan in two months

टॅग्स