छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवादी ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

या भागातून नक्षली जात असल्याची खबर छत्तीसगड पोलिसांना मिळताच जिल्हा पोलिस व डीआरजीचे पथके रवाना झाली. चकमकीनंतर नक्षलवाद्यांजवळील एके 47, 303 रायफल, 12 बोर बंदुका व अन्य नक्षल सामग्री जप्त करण्यात आली आहेत.

रायपूर : महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरील राजनांदगाव जिल्ह्याच्या बागनाडी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

छत्तीसगडचे पोलिस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिलेल्या माहितानुसार, छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात ही चकमक झाली. बोरतलाव या महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड (डीआरजी) आणि नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले. आज (शनिवारी) पहाटे ही चकमक झाली.

या भागातून नक्षली जात असल्याची खबर छत्तीसगड पोलिसांना मिळताच जिल्हा पोलिस व डीआरजीचे पथके रवाना झाली. चकमकीनंतर नक्षलवाद्यांजवळील एके 47, 303 रायफल, 12 बोर बंदुका व अन्य नक्षल सामग्री जप्त करण्यात आली आहेत. परिसरात अद्याप शोधमोहिम राबविण्यात येत आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 Naxalites Killed In Chhattisgarh Encounter Huge Cache Of Weapons Seized