मेरठ-लखनौ राज्यराणी एक्‍सप्रेस रूळावरून घसरली

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

रामपूर (उत्तर प्रदेश) - मेरठ-लखनौ राज्यराणी एक्‍सप्रेसचे आठ डबे आज (शनिवार) पहाटे साडे आठच्या सुमारास रामपूरजवळ रूळावरून घसरल्याने अपघात झाला आहे. यात दोन जण जखमी झाल्याचे रेल्वे मंत्रालयाने कळविले आहे.

रेल्वे मंत्रालयाने ट्विटरद्वारे या घटनेबाबत माहिती दिली आहे. या अपघातात केवळ एक जण जखमी झाला असून कोणतीही जीवित हानी झाले नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे. दरम्यान रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही या प्रकरणात वैयक्तिक लक्ष देत असल्याचे ट्‌विटरद्वारे सांगितले आहे. "परिस्थितीवर वैयक्तिक लक्ष ठेवत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तातडीने बचावकार्य पूर्ण होईल, याची खात्री आहे. या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल', अशी माहिती प्रभू यांनी दिली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय पथक पोहोचल्याचे वृत्त आहे.

Web Title: 8 coaches of Meerut-Lucknow train derail, several injured, inquiry ordered