esakal | पावसामुळे स्मशानभूमीतील छत कोसळले, अंत्यसंस्कारासाठी आलेले 40 जण ठार
sakal

बोलून बातमी शोधा

up building collapsed main.jpg

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गर्दी झाली होती. पावसामुळे सर्वांनी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या छताखाली आश्रय घेतला होता.

पावसामुळे स्मशानभूमीतील छत कोसळले, अंत्यसंस्कारासाठी आलेले 40 जण ठार

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

गाझियाबाद- दिल्ली नजीकच्या गाझियाबादमधील मुरादनगर येथे मोठी दुर्घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे स्मशानभूमीत निर्माणाधीण अवस्थेतील इमारतीचे छत कोसळले. यात अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक ढिगाऱ्याखाली आल्याने 40 जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याचे सांगण्यात येते. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मदतकार्य जारी
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाच्या मदत पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरीत जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर येथे झालेल्या घटनेची माहिती घेतली. त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना मदतकार्याबद्दल सूचना दिली असून पीडितांना हरतऱ्हेची मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या वारसदारांना 2-2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी मंडल आयुक्त, अतिरिक्त पोलिस महासंचालकांना घटनेसंबंधीचा अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा- कमल हासन यांच्या एका टि्वटवरुन वाद, काँग्रेसने साधला निशाणा

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गर्दी झाली होती. पावसामुळे सर्वांनी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या छताखाली आश्रय घेतला होता. त्याचवेळी अचानक इमारतीचे छत कोसळले. यात अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले गेले. अनेकांना तिथून बाहेरही निघता आले नाही. प्रशासनाने त्वरीत मदतकार्य सुरु केले. जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवले. 

हेही वाचा- "दोन्ही लशी 110 % टक्के सुरक्षित; नपुसंकत्वाच्या अफवा खुळचट"

loading image