कमल हासन यांच्या एका टि्वटवरुन वाद, काँग्रेसने साधला निशाणा

सकाळ ऑनलाइन टीम
Sunday, 3 January 2021

राज्यात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी अभिनयातून राजकारणात आलेले कमल हासन सध्या चर्चेत आहेत. याचदरम्यान टि्वटरवरील त्यांच्या एका पोस्टवरुन सोशल मीडियावर वादाला सुरुवात झाली आहे.

चेन्नई- तमिळनाडूमध्ये यावर्षी एप्रिल-मे मध्ये निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी अभिनयातून राजकारणात आलेले कमल हासन सध्या चर्चेत आहेत. याचदरम्यान टि्वटरवरील त्यांच्या एका पोस्टवरुन सोशल मीडियावर वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने याबाबत कमल हासन यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावरही इंटरनेट युजर्सनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

कमल हासन यांनी फूड बँक इंडियाच्या संस्थापक स्नेहा मोहनदास यांचे एक टि्वट आणि व्हिडिओ शेअर करत म्हटले होते की, आपली सुरक्षा आणि सशक्तीकरणासाठी आपली प्रतिष्ठा आणि संतुलन महत्त्वपूर्ण आहे. वरील गुणांमुळेच आपले आत्म-संरक्षण अहिंसक ठरु शकते. जेव्हा अंहिसा हिंसेशी मिळते, तेव्हा कोणताच सामना होत नाही. स्पष्टरुपाने गुन्हेगार समोर येतो. आपला आत्मविश्वास पेपर स्प्रेपेक्षा अधिक नुकसानकारक ठरु शकतो. 

हेही वाचा- सीरमच्या लशीला आप्तकालीन मंजुरी मिळताच अदर पुनावालांनी केलं टि्वट

तमिळनाडू महिला काँग्रेसच्या लक्ष्मी रामचंद्रन यांनी याप्रकरणी कमल हासन यांच्यावर टीका केली आहे. सर तुम्ही काय करत आहात ? मी स्वत: ला आणि प्रियजनांना गुन्हेगारी / खुनी / बलात्काऱ्यांपासून नुकसान पोहोचविण्यापासून वाचवण्यासाठी काहीही करेन. डिग्नि‍टी माय फुट!', असे त्यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा- बांगलादेशाचे सैनिक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये होणार सहभागी

तर एका महिला डॉक्टरने म्हटले की, एखाद्या महिलेने छळ केला किंवा अत्याचार केला तर तिचा सन्मान आणि संतुलन का ठेवले पाहिजे? जर खरंच एखाद्या महिलेच्या सुरक्षेची चिंता असेल तर त्याने पुरुषांना त्यांचे सन्मान टिकवून ठेवण्यास सांगावे आणि स्त्रियांना त्रास देऊ नये. '
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Controversy erupts over Kamal Haasans tweet on women congress slams