आसाममध्ये अतिवृष्टीनंतर पुराचा कहर, ४ लाखांहून अधिक लोक प्रभावित

8 killed and Over 4 Lakh Hit In Pre-Monsoon Floods In Assam
8 killed and Over 4 Lakh Hit In Pre-Monsoon Floods In Assam

आसाममध्ये सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या आठ झाली आहे, तर राज्यात 26 जिल्ह्यांमध्ये चार लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे 40 हजार लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. दिमा हासाओ हा सर्वाधिक प्रभावित जिल्हा गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या इतर भागापासून तुटला आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या अधिकार्‍यांनी सांगितले की, दक्षिण आसामच्या कछार जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दिमा हसाओ आणि लखीमपूर जिल्ह्यात भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कचर जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे सहा जण बेपत्ता आहेत.

ASDMA ने दिलेल्या माहितीनुसार, 24 जिल्ह्यांतील 811 गावांमध्ये किमान 2,02,385 लोक प्रभावित झाले आहेत आणि सुमारे 6,540 घरांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने 27 मदत वितरण केंद्रे उघडली असतानाही 33,300 हून अधिक लोकांनी 72 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. कचार, दिमा हसाओ, होजाई, चराईदेव, दररंग, धेमाजी, दिब्रुगड, बजाली, बक्सा, बिस्वनाथ आणि लखीमपूर या जिल्ह्यांचा सर्वाधिक फटका बसला आहे.

8 killed and Over 4 Lakh Hit In Pre-Monsoon Floods In Assam
राणांसोबत जे झालं त्यावर गप्प का? फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना सवाल

नॉर्थइस्ट फ्रंटिअर रेल्वे (NFR) च्या दिमा-हसाओ जिल्ह्याच्या अंतर्गत असलेल्या डोंगराळ भागातील विभागातील परिस्थिती मंगळवारी गंभीर होती कारण पर्वतीय प्रदेशात पाऊस सुरूच होता, ज्यामुळे लुमडिंग-बदरपूर सिंगल लाइन रेल्वे मार्गावर परिणाम झाला.

आसाममधील लुमडिंग-बदरपूर सेक्शन हा त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर आणि आसामच्या दक्षिण भागास देशाच्या इतर भागाशी जोडणारा एकमेव मार्ग आहे. गेल्या चार दिवसांपासून हा रेल्वे संपर्क तुटला आहे.

8 killed and Over 4 Lakh Hit In Pre-Monsoon Floods In Assam
असदुद्दीन ओवैसी २०१९ ला...; काँग्रेसकडून फडणवीसांची पोलखोल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com