पाकिस्तानी गोळीबाराने घेतला आठ महिन्याच्या बाळाचा जीव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

पाकिस्तानी रेंजर्स सीमा सुरक्षा दलाच्या चौक्या आणि नागरी वस्त्यांवर हल्ले करत आहेत.

काल (सोमवारी) रात्री जम्मू-काश्मीर येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने गोळीबार केला. पाकिस्तानने अचानक केलेल्या या हल्ल्यामुळे अनेक गावकरी अडकून पडले होते. या गोळीबारात एका आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. पाकिस्तानी रेंजर्स सीमा सुरक्षा दलाच्या चौक्या आणि नागरी वस्त्यांवर हल्ले करत आहेत. जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमधील सीरी कालाय गावात ही दुर्देवी घटना घडली. 

बीएसएफच्या प्रवक्त्याने माहीती दिल्यानुसार, भारताने पाकिस्तानच्या या हल्ल्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यास सुरवात केल्यानंतर पाक रेंजर्सने फोन करून बीएसएफला गोळीबार बंद करून शांतता राखण्याचे आवाहन केले होते. आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर जम्मू-काश्मीरच्या अर्णिया सेक्टर येथे पाकिस्तानी रेंजर्सनी भारतीय चौक्यांवर तोफगोळयांचा वर्षाव केला. भारतानेही पाकिस्तानच्या या हल्ल्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. सोमवारी पाकिस्तानने सीमारेषेवरील गावांना लक्ष्य केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: 8 Month Baby Died In Pakistan Firing On Jammu Kashmir Border