esakal | नव्या मोटर वाहन कायद्यांतर्गत ८ कोटी प्रवाशांना दंड, सुविधांपासून अद्यापही वंचित
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic Police

नव्या मोटर वाहन कायद्यांतर्गत ८ कोटी प्रवाशांना दंड, सुविधांपासून अद्यापही वंचित

sakal_logo
By
सुधीर काकडे

देशभरातील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांवर (Road Accidents) नियंत्रण मिळवण्यासाठी आणि प्रवाशांना सुविधा देण्यासाठी १ सप्टेंबर २०१९ ला नवा मोटर वाहन कायदा लागू करण्यात आला. नवा मोटर वाहन कायदा (New motor vehicle act 2021) लागू केल्यानंतर मागच्या २३ महिन्यांत तब्बल ८ करोड वाहनांचे चलन कापण्यात आले आहे. तर दुसरीकडे या दोन वर्षांत सुरक्षा समितीची स्थापना, रस्ते सुरक्षेसाठीचा खर्च, राज्य पातळीवर रस्ते सुरक्षा यंत्रणा आणि प्रवाशांना सुविधा देण्याच्या बाबतीत फारशी प्रगती दिसुन आलेली नाही.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले होते की, मोटर वाहन कायदा लागु करण्यापुर्वीच्या २३ महिन्यांत १,९६,५८,८९७ ट्राफिक चलनच्या माध्यमातून वाहनांवर दंड लावण्यात आला होता. तर हा कायदा लागु केल्या नंतर ही संख्या वाढून ७,६७,८१,७२६ वर पोहोचली असल्याचे दिसते आहे. या आकडेवारीवरुन असे दिसुन येते की, हे प्रमाण चार पटीने वाढले आहे.

हेही वाचा: कोरोना रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ; तिसऱ्या लाटेची भीती

एका वर्षांत गेले जीव

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २०१९ या वर्षात भारतात ४,३७,३९६ अपघात झाले. धक्कादाय म्हणजे या सर्व अपघातांमध्ये १,५४,७३२ लोकांनी आपले प्राण गमावले आणि ४,३९,२६२ लोक जखमी झाले आहेत. तर २०१८ मध्ये रस्ते अपघातात १,५२,७८० लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला. २०१९ साली झालेल्या ४२१९५९ अपघातांच्या कारणांचा विचार केल्यास ४११,१०४ अपघातांचे कारण वाहनांची धडक होणे, नैसर्गिक कारणांमूळे होणारे अपघात तसेच चालकाकडून झालेल्या चुकांमुळे होतात. विशेष म्हणजे रस्ते अपघातात झालेल्या १,५४,७३२ मृत्यूपैकी ३८ टक्के अपघात हे दुचाकीस्वारांचे झाले आहेत.

loading image
go to top