
"800 हिंदू कुटुंबं पाकमध्ये परत गेली, केंद्रासाठी शरमेची बाब"
नवी दिल्ली : भारतात आश्रयाला असलेले पाकिस्तानातील ८०० हिंदू पुन्हा पाकिस्तानात परतल्याचा दावा करत मोदी सरकारसाठी ही शरमेची बाब असल्याचं भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. स्वामींनी यासंदर्भात ट्विट केलं असून केंद्रावर टीकास्त्र सोडलं आहे. (800 Hindus return to Pakistan matter of shame for Modi govt Criticism of Subramanian Swamy)
सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं की, "मानवाधिकारांचं उल्लंघन झालेले पाकिस्तानातील ८०० हिंदू पीडित जे भारताच्या आश्रयाला आले होते. या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळेल अशी आशा होती. पण मोदी सरकारनं सीएए कायद्यावर आद्याप कार्यवाही सुरु न केल्यानं निराश झालेले हे लोक पुन्हा पाकिस्तानात परतले आहेत, ही बाब केंद्रातील भाजप सरकारसाठी शरमेची बाब आहे"
हेही वाचा: शिवसेनेत धुसफूस; अनिल परब, उदय सामंत यांच्यावर पदाधिकारी नाराज
सन २०११ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारनं पाकिस्तानात राहणाऱ्या ज्या हिंदू कुटुंबियांना अत्याचाराला सामोर जावं लागलं होतं, त्यांना दीर्घकालिन व्हिसा म्हणजेच एलटीव्ही देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर शेकडो हिंदू आणि शीख धर्मीय लोक भारतात आले होते. पण सुमारे दहा वर्षांनंतरही भारताची नागरिकता मिळू न शकल्यानं ८० हिंदू कुटुंबांना नाईलाजानं पाकिस्तानात परतावं लागलं आहे. या कुटुंबांनी नागरिकता मिळावी यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये अनेक चकरा मारल्या, पण त्यांचं काम झालं नाही. पाकिस्तानी अल्पसंख्यांक प्रवाशांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या भारतातील सीमांत लोकसंगठन या संघटनेनं हा दावा केला आहे. यावरुन सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्राला सुनावलं आहे.
हेही वाचा: असनी चक्रीवादळाचा प्रभाव; मॉन्सूनसाठी करावी लागणार प्रतीक्षा
दरम्यान, भारतात नागरिकत्व संशोधन कायदा अर्थात सीएए लोकसभेत सन २०१९ मध्ये मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आदी देशांमधील पीडित अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन धर्मिय जे डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आले आहेत त्यांना भारताची नागरिकता देण्यात येणार आहे. या कायद्यावरुन देशभरात मोठा क्षोभ झाला होता, दरम्यान अद्याप या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही.
Web Title: 800 Hindus Return To Pakistan Matter Of Shame For Modi Govt Criticism Of Subramanian Swamy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..