
असनी चक्रीवादळाचा प्रभाव; मॉन्सूनसाठी करावी लागणार प्रतीक्षा
मुंबई : हिंदी महासागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने असनी चक्रीवादळ आता बांग्लादेश आणि म्यानमारच्या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचले असून १९ किमी प्रतीतास या वेगाने हे वारे वाहत आहेत. अस्नी चक्री वादळ आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगाल मध्ये धडकेल यामुळे त्या राज्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
(Asani Cyclone Effect On Maharashtra Mansoon)
हेही वाचा: 'बलात्कार केला, व्हिडीओ काढले, गोळ्या खायला लावल्या'; मंत्र्याच्या मुलावर गुन्हा
दरम्यान या असनी वादळामुळे मॉन्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही पण मॉन्सूनची प्रतीक्षा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिमेच्या वाऱ्याची दिशा अंदमान कडून केरळकडे जाईल आणि त्यानंतर मॉन्सून भारतात दाखल होईल. दरम्यान, या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात महाराष्ट्रात पूर्व मॉन्सून दाखल होईल त्यामुळे पहिल्या टप्प्यात दक्षिण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा: पाकिस्तान ते तेलंगाणा via पंजाब; दहशतवाद्यांच्या तस्करी कारवाया सुरूच
सध्या राज्यभर पारा चढलेला असून विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातदेखील पारा ४० डिग्री सेल्सीअसच्या वर असणार असल्याचा अंदाज आहे. येणाऱ्या काही दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात पश्चिमेचे वारे वाहून ढगाळ वातावरण राहील, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात काही भागात तुरळक पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
Web Title: Asani Cyclone Effect Maharashtra Mansoon Rain Waiting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..