Unseasonal Rain : ‘यूपी’, बिहारमध्ये पावसामुळे ८३ जणांचा मृत्यू

एकीकडे देशातील राजस्थान, गुजरातसारख्या राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट आली असताना दुसरीकडे काही राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे.
heavy rain
heavy rainsakal
Updated on

लखनौ, पाटणा - एकीकडे देशातील राजस्थान, गुजरातसारख्या राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट आली असताना दुसरीकडे काही राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये अवकाळी पावसासह विजा, गारपीट व वादळामुळे ४८ तासांत ८३ जणांचा मृत्यू झाला. यात बिहारमधील ६१ तर उत्तर प्रदेशातील २२ जणांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक २२ मृत्यू बिहारमधील नालंदात गुरुवारी (ता.१०) झाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्रभावित भागांचा दौरा करून तत्काळ मदत व बचावकार्य राबविण्याचे आदेश दिले आहेत. पिकांच्या नुकसानीचा व्यापक पंचनामा करून राज्य सरकारला तत्काळ अहवाल सादर करावा. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई दिली जाईल, असेही आदित्यनाथ यांनी सांगितले.

हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्य व पूर्व उत्तर प्रदेशातील २४ जिल्ह्यांत जोरदार पावसासह विजा कोसळण्याच्या घटना घडल्या. बिहारची राजधानी पाटण्यालाही जोरदार पावसाने झोडपले. तिथे ४२. मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे सखल भागात पाणी साठले होते. बिहारमधील दरभंगा, पूर्वी चंपारण, पश्चिम चंपारण आदी जिल्ह्यांत हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com