बिहारमध्ये वादळाचा कहर! वीज कोसळून 83 लोक ठार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

गुरुवारी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये वीज कोसळल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये वीज पडून तब्बल 83 जणांचा मृत्यू झाला आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली- देशात मान्सून दाखल झाल्याने जोरदार पावसाचा क्रम सुरु झाला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात वादळ-वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये वीज कोसळल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये वीज पडून तब्बल 83 जणांचा मृत्यू झाला आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये 23 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात मिळून 106 लोकांना वीज पडल्याने जीव गेला आहे.

कोरोनावरील औषधावर पतंजलीचा अजब खुलासा; बातमी वाचाच...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. 'बिहार आणि उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वीज पडल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याची दु:खद बातमी आली आहे. राज्य सरकारे तात्काळ  मदत कार्याला लागली आहेत. या घटनेत ज्यांना आपला जीव गमवाला लागला आहे अशांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो', असं मोदी म्हणाले आहेत. 

कोरोनावरील संभाव्य लसीच्या मानवी चाचणीला ब्रिटनमध्ये सुरवात 
बिहारमधील गोपालगंज येथे वीज पडल्याने 13 लोकांचा जीव गेला आहे. पूर्णीयात 2, जमुई 2, जहानाबाद 2, सीतामढी 1, नवादामध्ये एकाचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे. तर बिहारच्या विविध भागात वीज कोसळून एकूण 83 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्मंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

उत्तर प्रदेशात गोरखपूरमध्ये वीज पडल्यामुळे सर्वात जास्त मृत्यूमुखी पडले आहे. मुसळधार पाऊस आणि वीजेमुळे गोरखपूर-बस्ती मंडलमध्ये 13 लोकांचा जीव गेला आहे. तसेच अनेकजण वीजेमुळे पोळून निघाले आहेत. अनेक लोक शेतामध्ये काम करत होते. जोराचा पाऊस सुरु झाल्याने काही लोकांनी झाडाचा आडोसा घेतला होता. देवरिया जनपदमध्ये सर्वाधिक लोकांचा जीव गेला आहे. सिद्धार्थनगर जिल्ह्यात 3 तर कुशीनगरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वीज पडल्याने गंभीररीत्या भाजलेले 9 लोक देवरिया जिल्ह्यातील आहेत. या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

 

देवरिया जनपदमधील एका भागात गुरुवारी पाऊस आणि वीजेमुळे एका सात वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तसेच शेतकऱ्यासह दोघांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक शेतात काम करत असताना ही घटना घडली आहे. दरम्यान, उत्तर भारतात येत्या 24 तासाच मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 83 killed in Bihar thunder strom