देशात महागाईचा उच्चांक; भाजीपाल्याचे दर वाढले, मोजावी लागतेय दुप्पट किंमत

भारतात सुमारे 87 टक्के कुटुंबे भाजीपाल्याच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त असल्याचे एका लोकल सर्कलने केलेल्या सर्वेक्षणात सांगितले.
vegetables
vegetablessakal

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे महागाईचा भडका उडाला आहे. यातच भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. भारतात सुमारे 87 टक्के कुटुंबे भाजीपाल्याच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त असल्याचे एका लोकल सर्कलने केलेल्या सर्वेक्षणात सांगितले. भाज्यांसाठी दुप्पट पैसे देत असल्याचा दावा सात टक्के कुटुंबांनी केला तर भारतातील प्रत्येक 10 पैकी नऊ कुटुंबांना गेल्या महिन्याभरात भाजीपाल्याच्या वाढत्या किमतीमुळे आर्थिक तफावत सहन करावी लागत असल्याचेही या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. (Seven per cent of the households claimed that they are paying double for the same quantity of veggies.)

vegetables
मोदी मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाच्या हालचाली

सर्वेक्षण करणार्‍या लोकल सर्कलने सांगितले की, त्यांना भारतातील 311 जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून 11,800 लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि त्यातील सुमारे 87 टक्के भारतीय कुटुंबे मार्चपासून भाज्यांच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त आहे. यापैकी 37 टक्के लोकांनी भाजीपाल्यांवर 25 टक्क्यांहून अधिक खर्च होत असल्याचे सांगितले. (87 per cent of households in India are suffering due to the hike in vegetable prices)

vegetables
भारतात सरकारी अधिकारी माध्यमांना धमक्या देतात : अमेरिका रिपोर्ट

सर्वेक्षणानुसार गेल्या महिन्यात काही भाज्यांचे भाव गगनाला भिडले होते.तर आता यातही 10-25 टक्के भाव वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हे सर्वेक्षण लोकल सर्कलद्वारे करण्यात आले या सर्वेक्षणात सुमारे 64 टक्के पुरुष तर 36 टक्के महिलांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com