87 वर्षांच्या आजीबाई बांधत आहेत शौचालय

वृत्तसंस्था
शनिवार, 5 मे 2018

"मला वाटते की, निरोगी आरोग्यासाठी सर्वांनी शौचालय वापरायला हवे.  उघड्यावर शौचालय केल्याने रोगराईला आमंत्रण मिळते. मी गरीब आहे, माझ्याकडे शौचालय बांधण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून मी स्वत: शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. यावेळी मी माझ्या मुलाच्या मदतीने शौचालय बांधत आहे"

उद्यमपूर - "मला वाटते की, निरोगी आरोग्यासाठी सर्वांनी शौचालय वापरायला हवे.  उघड्यावर शौचालय केल्याने रोगराईला आमंत्रण मिळते. मी गरीब आहे, माझ्याकडे शौचालय बांधण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून मी स्वत: शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. यावेळी मी माझ्या मुलाच्या मदतीने शौचालय बांधत आहे". असे श्रीमती राखी यांनी स्पष्ट केले आहे .

जम्मू कश्मीरमधील उद्यमपूर जिल्ह्यातील 87 वर्षांच्या आजीबाई त्यांच्या बदाली गावातील आपल्या घराजवळ स्वत: शौचालय बांधत आहेत. अलिकडे त्यांच्या गावात जिल्हा प्रशासनाने जागरुकता शिबिर आयोजित केले होते, या शिबिरात उघड्यावर शौचालय केल्याने होणारे दुषित परिणाम समजून सांगण्यात आले. श्रीमती राखी यांना त्यावेळी स्वच्छतेचे महत्व पटले आणि त्यांनी त्यामधून प्रेरणा घेऊन आपल्या घरासमोर शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला.

उद्यमपूरचे उपायुक्त यांना माहीती मिळाल्यावर ते याबद्दल जाणून घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी राखी यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले "ही बदलाची वेळ आहे, राखी यांनी केलेल्या कामातून प्रेरणा घेऊन सर्वांनी स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे यायला हवे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणूनही 2019 पर्यंत सहा कोटी शौचालये बांधण्याचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगातुन श्रीमती राखी यांनी स्वत: हाती घेतलेला शौचालय बांधण्याचा उपक्रम खुपच स्तुत्य आहे.

Web Title: 87 Year Old Takes Swachh Lead Builds Toilet In Her Village